Ad will apear here
Next
सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार
पुणे : भारतीय जनता पक्षाचा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. या निमित्ताने भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी शहरभर विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. प्रभाग क्रमांक १९मध्येदेखील वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता मोहीम व सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला.
‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत देशाच्या स्वच्छतेचा वसा सर्वांनी घेतला आहे. त्यात भाजपचे उत्साही कार्यकर्ते, पदाधिकारी कसे मागे राहणार? नगरसेविका मनीषा लडकत आणि अर्चना पाटील यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत कासेवाडी झोपडपट्टी व लोहियानगर भागात साफसफाई केली. नियमित सफाई करून शहर स्वच्छ ठेवणाऱ्या पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक व सत्कार या वेळी करण्यात आला. रफिक हबीब शेख, शंतनू बापू कांबळे, वाघमारे व पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZUZBB
Similar Posts
भाजपतर्फे पुण्यात कृतज्ञता समारंभ पुणे : भारतीय जनता पक्षाचा सदतिसावा वर्धापन दिन नुकताच पार पडला. वर्धापनदिन व महानगरपालिकेत पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल पुण्यातील रमणबाग शाळेच्या मैदानात कृतज्ञता समांरभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महापौर मुक्ता टिळक, तसेच भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, रवी भुसारी, रवी अनासपुरे, गटनेते
मुलांनी लुटला आंबा खाण्याचा आनंद पुणे : शहरभर भारतीय जनता पक्षाचा सदतिसावा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने दत्तवाडी येथे बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांतर्फे या वेळी भारतमाता पूजन करण्यात आले.  गरीब व निराधार मुलांना आंबा खाण्याचा आनंद मिळावा यासाठी बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते
वानवडी येथे स्वच्छता मोहीम पुणे : वानवडी सर्कल येथे गुरुवारी (सहा एप्रिल) स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत’ या मोहिमेअंतर्गत देशभरात स्वच्छता मोहिमा राबवण्यात येत आहेत. सर्वत्र रविवारी किंवा सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी स्वच्छतेचे उपक्रम राबवले जातात. असाच स्वच्छता उपक्रम वानवडी येथे आयोजित करण्यात आला होता
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची वॉर-रूम कार्यान्वित पुणे : ‘विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी वॉर-रूम कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टीम पोचणार असून, आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे,’ अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी रविवारी (८ सप्टेंबर) पत्रकारपरिषदेत दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language